“वेट एन जॉय” वॉटर पार्क हे तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत सहलीचे नियोजन करण्यासाठी एक उत्कृष्ट आणि परिपूर्ण ठिकाण आहे.
कारण वॉटर पार्क तुम्हाला संधी देते अमर्यादित पॅकेजची. ज्यामुळे सवलतीच्या दरात आपण रोमांचकारी थरारक स्लाईडसचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता. असा अनुभव की जो यापूर्वी कधीही तुम्ही घेतला नसेल. “वेट एन जॉय” वॉटर पार्क हे शिर्डी मधील एक नितांत सुंदर ठिकाण आहे.
वॉटर स्लाईड्सचे मजेशीर खेळ तुम्हाला खूप सुखद अनुभव देतात. अनेक राईड्स उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत, सर्वात मोठ्या वेव्ह पूल मधला अनुभव तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. हे अनुभव आपल्या मित्र आणि कुटुंबासह संस्मरणीय करा. वेट एन जॉय वीक एंड साजरा करणे म्हणजे इथून भरपूर उत्साहित होऊन जाणे. तेव्हा विचार कसला करताय ?….. वेट एन जॉय वाटर पार्क शिर्डीला भेट द्या आणि वॉटर राईडचा आनंद घ्या आणि सभोवतालच्या प्रफुल्लीत वातावरणात रोमांचित व्हा. लक्षात असू द्या “वेट एन जॉय” म्हणजे अफलातून मज्जा आणि शब्दशः धमाल !!!
इथे कोणत्याही ऋतू मध्ये आणि सर्व वयोगटातील पर्यटकांना परिपूर्ण आनंद देणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक राईड्स आणि स्लाईड्स आहेत. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो मित्रांच्या सह आणि परिवारासह साहस , धाडस, जल्लोष केल्याचा, मनसोक्त जलक्रीडा केल्याचा आणि खूप काही तरी अविस्मरणीय केल्याचा……… रोमांच, साहस, स्प्लॅश स्लाइड्स, मस्ती, करमणुकीने भरलेला एक अविस्मरणीय आश्चर्यकारक अनुभव तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी आहे.
सर्वाधिक लोकप्रिय राईड्स वेट एन जॉय वाटर पार्क शिर्डी मधील सर्व राईड्स बालकांना तरुण तरुणींना आणि प्रौढांना तसेच ज्येष्ठ पर्यटकांना देखील मनमुराद आनंद देणाऱ्या आहेत अशा तब्बल २५ विविध दर्जेदार सुरक्षित राईड्स चा आनंद आपण आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घेऊ शकता
लोकप्रिय राइड्समध्ये समाविष्ट आहे: फॅमिली/किड्स आणि हाय थ्रिल राइड्स. मल्टी प्ले स्टेशनमध्ये 8 राइड्स आहेत. मल्टी रेसर राइड्स तीन आहेत.