“वेट’एनजॉय” वॉटरपार्क हे तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत सहलीचे नियोजन करण्यासाठी एक उत्कृष्ट आणि परिपूर्ण ठिकाण आहे.
कारण वॉटर पार्क तुम्हाला संधी देते अमर्यादित पॅकेजची. ज्यामुळे सवलतीच्या दरात आपण रोमांचकारी थरारक स्लाईडसचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता. असा अनुभव की जो यापूर्वी कधीही तुम्ही घेतला नसेल. “वेट’एनजॉय” वॉटर पार्क हे शिर्डी मधील एक नितांत सुंदर ठिकाण आहे.
वॉटर स्लाईड्सचे मजेशीर खेळ तुम्हाला खूप सुखद अनुभव देतात. अनेक राईड्स उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत, सर्वात मोठ्या वेव्ह पूल मधला अनुभव तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. हे अनुभव आपल्या मित्र आणि कुटुंबासह संस्मरणीय करा. वेट’एनजॉय वीक एंड साजरा करणे म्हणजे इथून भरपूर उत्साहित होऊन जाणे. तेव्हा विचार कसला करताय ?….. वेट’एनजॉय वाटर पार्क शिर्डीला भेट द्या आणि वॉटर राईडचा आनंद घ्या आणि सभोवतालच्या प्रफुल्लीत वातावरणात रोमांचित व्हा. लक्षात असू द्या “वेट’एनजॉय” म्हणजे अफलातून मज्जा आणि शब्दशः धमाल !!!
इथे कोणत्याही ऋतू मध्ये आणि सर्व वयोगटातील पर्यटकांना परिपूर्ण आनंद देणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक राईड्स आणि स्लाईड्स आहेत. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो मित्रांच्या सह आणि परिवारासह साहस , धाडस, जल्लोष केल्याचा, मनसोक्त जलक्रीडा केल्याचा आणि खूप काही तरी अविस्मरणीय केल्याचा……… रोमांच, साहस, स्प्लॅश स्लाइड्स, मस्ती, करमणुकीने भरलेला एक अविस्मरणीय आश्चर्यकारक अनुभव तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी आहे.
सर्वाधिक लोकप्रिय राईड्स वेट’एनजॉय वाटर पार्क शिर्डी मधील सर्व राईड्स बालकांना तरुण तरुणींना आणि प्रौढांना तसेच ज्येष्ठ पर्यटकांना देखील मनमुराद आनंद देणाऱ्या आहेत अशा तब्बल २५ विविध दर्जेदार सुरक्षित राईड्स चा आनंद आपण आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घेऊ शकता
लोकप्रिय राइड्समध्ये समाविष्ट आहे: फॅमिली/किड्स आणि हाय थ्रिल राइड्स. मल्टी प्ले स्टेशनमध्ये 8 राइड्स आहेत. मल्टी रेसर राइड्स तीन आहेत.
वेट’एनजॉय वाटर पार्क शिर्डी मध्ये आहे भारतातील सर्वात मोठे जल क्रीडेचे अत्याधुनिक केंद्र ! इथे तुम्हाला मिळते साहसाची भरपूर संधी या भागात साहस प्रेमींच्या विविध वयोगटांना अनुरूप अशा असंख्य व्हरायटीच्या स्लाइड्स आहेत. सर्व वयोगटांना मल्टीप्ले स्टेशनवर आनंदाचा जलमय जल्लोष अनुभवण्यासाठी सादर आमंत्रण आहे……
तीव्र उकाड्याच्या दिवसात दिवसात थंड होण्यासाठी अफलातून गारवा अनुभवण्यासाठी आणि कुटुंबासोबत अमर्याद मजा करण्यासाठी वेट’एनजॉय वाटर पार्क शिर्डी हे लाखो देशी विदेशी पर्यटकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती दिलेले सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. यामध्ये सर्व वयोगटांसाठी बॉडी स्लाइड्स, ट्यूब स्लाइड्स आणि स्प्लॅश वॉटरसह फॅमिली स्लाइड्स इत्यादी विविध स्लाइड्स समाविष्ट आहेत.
पावसाळा असो व नसो वेट’एनजॉय वाटर पार्क शिर्डी मध्ये बाराही महिने रेन डान्स करण्याची संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिली आहेनाचण्याचे वेड असलेले तुमचे मित्र गोळा करून घेऊन या आणि आमच्या प्रसिद्ध डीजेने वाजवलेल्या नवीनतम गाण्यांवर तुमचा हार्ट डान्स करा. त्यासाठी प्रभावशाली ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे.
पोटपूजे शिवाय जगात सारेच अपूर्ण आहे!आपल्याला चव, भूक तृप्ती आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी अन्न प्रमुख भूमिका बजावते. त्यामुळेच आपल्याला शक्ती मिळते आणि आपण उत्साही व सक्रीय राहातो……. शरीर उत्तम असेल तर आपण सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो…….
चविष्ट पाककृतींचा आणि विविध प्रकारचे रुचकर पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्याला आवडतात. वेट’एनजॉय वाटरपार्क शिर्डी मध्ये आपल्यासाठी जगभरातील विविध पाककृतींचा आनंद घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तीही अत्यंत प्रसन्न स्वच्छ आरोग्यदायी वातावरणात…..
इथल्या अन्न पदार्थांची चव दीर्घकाळ तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील याची खात्री आहे. तुमच्यासह आलेले तुमचे सर्व मित्र मंडळी कुटुंबीय नक्कीच या अन्नाचा मनमुराद स्वाद घेतील याची मनाशी खात्री बाळगा……
फ्रेंड्स रेस्टॉरंटही पार्क मधली सर्वात चविष्ट जागा…….खवैय्यांची मनपसंत जागा…. शंभर टक्के आरोग्यदायी वातावरणात एकसे बढकर एक पदार्थ तुमच्या भेटेची रानात वाढवते .इथली चव आणि आठवण दोन्हीही तुमच्या मनात जपले जाणार याबाबत मुळीच शंका नाही……. हे रेस्टॉरंट जे तोंडाला पाणी आणते आणि तुमची चवदार पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णही करते जेथे तुमचे कुटुंब आणि मित्र काही स्वादिष्ट पदार्थांसह रेस्टॉरंट मध्ये आपण चांगला वेळ घालवू शकता!
वेट’एनजॉय वॉटरपार्क शिर्डीमध्ये भारतीय, चायनीज, इटालियन आणि अमेरिकन यांसह विविध प्रकारचे चमचमीत खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि रेस्टॉरंट्स आहेत.
वेट’एनजॉय वाटरपार्क शिर्डी
पार्क उघडण्याची वेळ सकाळी १०:३० वाजता
पार्क बंद होण्याची वेळ सायंकाळी ०५:३० वाजता
Holi Special- Water Park Time will be 8AM – 6PM on 14th March 2025
Notes: The Bom-Bay (Red) & Dare Devil Drop (Yellow) Slide will be closed on 20 & 21 March 2024 due to Under Maintenance.